Saturday, March 24, 2018

स्वास्थ्य/ Well-being: To begin with


समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः । प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधीयते ॥


ज्या मनुष्या मधील वात, पित्त आणि कफ दोष तसेच अग्नि (जठराग्नि), रसादि सप्त धातु, सम अवस्थेमध्ये  किंवा स्थिर राहतात, मल मूत्रादि क्रिया ठीक होतात आणि  शरीरातील सर्व क्रिया योग्य आणि उचित आहेत, आणि ज्यांचे मन, इंद्रिय व आत्मा प्रसन्न आहेत तो मनुष्य स्वस्थ आहे. 


According to World Health Organization

Health is a state of complete Physical (structure, development, functioning and maintenance of body ), Mental (emotional flexibility), Social (satisfactory relationship/ social acceptance), Intellectual (cognition/ acquire knowledge) and Spiritual well being (personal beliefs/ values/ in search of purpose of life) and not merely an absence of disease. 

TO BEGIN WITH 


Start your day as early as possible. From Vedic context,  an appropriate time to wake up in the morning is known as "Brahma Muhurta" i. e. 96 mins before sunrise (ideally at 04:24 am if sunrise is at 06:00 am). Let's understand the maths behind, 1 Muhurta/ phase = 48 mins (so 2 Muhurta's before sunrise) or 4 Ghatika's (1 Ghatika = 24 mins) before sunrise 
{1 day = 24 hrs = 1440 mins = 30 Muhurtas}  
 From health viewpoint, Ayurveda believes that human body is composed of three Doshas, they are Vata (air/ ether), Pitta (fire/ water) and Kapha (water/ earth). Now let's correlate their predominance with Muhurtas. 
Sunrise to 10:00 am is the time of Kapha, 10:00 am to 02:00 pm is the time of Pitta and 02:00 pm to 06:00 pm is the time of Vata. This works in a cyclic manner, again 06:00 pm to 10:00 pm is the time of Kapha, 10:00 pm to 02:00 pm is the time of Pitta and 02:00 pm to sunrise is the time of Vata. 

This last Muhurta/ phase physiologically helps us to fasten the process of excretion of the waste materials from our body naturally, and as it happens, body attains a state of ease. Modern medicine also gives evidences of mindfulness during this phase as natural production of Melatonin (hormone secreted by pineal gland situated just above the middle brain) is at peak before sunrise. This particular hormone helps to maintain our sleep and wake up cycle thus stabilises our Mind. 
Practicing any form of exercise especially Yoga and meditation or spiritual/ religious activities is experienced to be ideal in this phase. If you practice any exercise or Asana with mindfulness/ complete awareness (breathing), it helps you to bring harmony between mind and body which eventually can lead to physical, mental, Intellectual, social and spiritual well-being. 
Practioner may experience deep state of meditation and relaxation during this phase. 

So, 

LET'S take first step towards स्वास्थ्य 

In our next post, let's discuss upon "TO END WELL" Sound Sleep. 




Wednesday, June 29, 2016

आषाढी एकादशी वारी... एक अनुभव

खरतर वारी हा महाराष्ट्रातील एक सण वा उत्सवच म्हणावा लागेल. कुठुन कुठुन लोक आपापली कामे पूर्ण करून वा कुण्या कर्त्या वर सोपवून ह्या उत्सवात सहभागी होतात. प्रत्येकाची एकच इच्छा, पांडुरंगाचे दर्शन होणे! (मग एरवी घेतलेले दर्शन आणि ह्या process मधून गेल्या नंतरचे दर्शन काही निराळेच असावे. पण दर्शन होणे महत्त्वाचे की process मधून जाणे? किंवा हे अनुभवण्याचा भाग असू शकतो. असो... )
आज दि. 29 जून 2016,  ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी आपल्या पुण्यनगरीत येणार म्हणून सर्व स्तरांवर तयारी सुरू झाली असावी. आमच्या सारख्यांच्या तयारीत प्रामुख्याने, नंतर गर्दी होते म्हणून office मधून लवकर पळ काढणे वगैरे वगैरे गोष्टी मनात येतात. पण कितीही plan करूनही आज मात्र लवकर निघता काही आले नाही, कदाचित प्रत्यक्ष सहभागी होता यावे म्हणून असेल कदाचित किंवा ती लगबग पाहता यावी म्हणून कदाचित...
परंतु यंदा तरी दुसरीच शक्यता खरी ठरली आणि सदाशिव पेठ ते पाषाण असा प्रवास सुरू झाला. नेहमीप्रमाणे जातो त्या मार्गाने निघालो, रस्ता मोकळा होता (पालखी साठी) म्हणून थेट बालगंधर्व चौका पर्यंत अगदी non stop आलो, आणि इथून पुढे खरा प्रवास सुरू झाला (पालखी बरोबर, तोही गाडी वरून).
बंदोबस्त ठेवण्यात traffic पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती, सोबतीला अनेक स्वार्थी (TV मध्ये...वगैरे ) नि स्वार्थी कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु पुणेरी traffic ते कोणाला ऐकेल काय! (वारकरी देखील थक्क झाले असावेत ह्या वाहतुकीचा पसारा पाहून) त्यामुळे यंत्रणा असूनही अनेक ठिकाणी jam! तेवढ्यात बालगंधर्व चौकात  एका दिंडीचे दर्शन झाले (अजून तिथेच होतो). दिंडी पुढे मार्गस्थ झाली आणि आमची गाडी थोडी पुढे सरकली आणि घोले रोड मार्गे निघाली. काही अंतर पुढे आलो आणि पुन्हा jam! मग काय मोकळा रस्ता दिसेल तिथे (एक मेकांना शिव्या घालत) लोक गाड्या चालवत होते. आपण सुद्धा ह्याच मातीतले (पुणे ग्रह निवासी), मग काय घातली गाडी, घोले रोड व modern college ला जोडणाऱ्या बोळात आणि थेट ज्ञानेश्वर पादुका चौकात (वारीशीच जोडला गेलेला चौक) परंतु पुन्हा एकदा jam! (रस्ताच बंद... ). तसेच उलटे फिरून जंगली महाराज रस्त्यावरून सोडतायत असे कानावर पडले आणि सर्व गाड्या परत फिरून modern च्या चौकात, पोलीसांनी अडवले (दिंडी चालली ऐटीत... म्हणजे IT च्या लोकांची) छान वाटले त्यांचे हे रूप बघून. आता मात्र मोठापल्ला no jam (दोन दिंडीं मध्ये gap... क्षणभर गणेश मिरवणूकीची आठवण झाली) पण मग मोकळा रस्ता आणि गाड्या ह्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आणि काहीसे पासही झालो व थेट अलका च्या चौकात गाडी थांबली. सर्व वयोगटातील लोक ह्या चौकात पालखीचे दर्शन ह्वावे म्हणून अधिपासूनच आपापली जागा पकडून उभे राहिले होते.
अलका चा signal (मामांचा) सुटला आणि असे वाटले की सुटलो एकदाचा (पुण्याच्या traffic मधून, वारीच्या नाही). मग विमलाबाई गरवारे वरून एक एक गल्ली क्रमांक (प्रभात रोड) डाव्या उजव्या बाजूला सारून पोहोचले ते law college रस्त्यापर्यंत. मग काहीसा मोकळा रस्ता मिळाला आणि जसे आम्ही symbiosis पर्यंत पोहोचलो आणि पुढ्यात, विशाल अश्या समुद्रात जशा लाटा फिरत असतात त्या प्रमाणे गाड्याच गाड्या एका मागून एक संथ गतीने पुढे सरकत होत्या.
असाच प्रवास सुरू ठेवत कसा बसा University पर्यंत पोहोचले आणि ज्या रस्त्याला जणूकाही कशाशी देणेघेणे नाही अशा शांत रस्त्यावरून (पाषाण) थेट (nan sthop) घरी...साधारणतः 8-9 km चे अंतर 1:30- 1:45 तासात कापण्याचा विक्रम झाला असावा... कदाचित.
मनात एकच विचार चालू होता, यंदा गाडी वरून का होईना पण वारी घडली... कदाचित पुढल्या वर्षी खरी घडेलही.       न जाणो.